Home गुन्हे जगत सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

0
सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेला सी.बी.आय सह मूळ तक्रारदाराने आक्षेप घेतला. अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सी.बी.आय ला देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

ही याचिका करण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला गेला होता. न्यायालयाने यावेळी मूळ तक्रारदाराची हस्तक्षेप याचिका करण्याची मागणी मान्य करताना राज्य सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अशी याचिका राज्य सरकार कशी काय करू शकते ? राज्य सरकारला अशी याचिका करण्याचा अधिकार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

सी.बी.आय तर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सरकारच्या याचिकेला विरोध केला. तपास रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here