Home गुन्हे जगत सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

0
सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून एका इसमास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ३ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्या ताब्यातून २,२१,७००/- रुपये किंमतीचे ६२.०० ग्रॅम सोने (३ मंगळसूत्र) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here