Home आपलं शहर युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन

युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन

0
युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार! – राजेश करवीर

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

बोईसर, 26 डिसेंबर: बोईसर सह संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व ओमीक्रोन व्हायरसचा प्रभाव देखील वाढत असताना बोईसर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मात्र कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चक्क आंदोलन करावे लागत आहे. बोईसर येथील गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांनी आपल्या इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत बाजार विक्रेत्यांना खुलेआम बसवून कोरोना नियमांचे पायमल्ली करत समज देण्याकरिता गेलेल्या युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नावाने धमकवण्याचे प्रयत्न केला जात आहे असे माजी उपसरपंच व युवा प्रतिष्ठान बोईसरचे सरचिटणीस राजेश करवीर यांनी सांगितले.

सदस्य गण ग्रामपंचायत असताना औषध फवारणी, दूर फवारणी असो किंवा कचरा व्यवस्थापन समस्यचे निवारण तात्काळ होत होते मात्र प्रशासकाने ग्रामपंचायतीचे सुत्र हाती घेतल्यापासून ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याकडून या सर्व बाबींचा विचार केला जात नाही असे देखील करवीर यांनी प्रशासक हेमंत भोईर यांना बोलताना सांगितले आहे.

दरम्यान प्रशासक भोईर यांनी गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांना नोटीस देऊन पुढील योग्य ती कार्यवाही करणे बाबत वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करण्यात येईल व बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगत घंटानाद आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले.

घंटानाद आंदोलनात युवा प्रतिष्ठान बोईसरचे अध्यक्ष विक्रम धोडी, सरचिटणीस राजेश करवीर सह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here