Home आपलं शहर सावधान ! १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्यास त्यांच्या पालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार..

सावधान ! १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्यास त्यांच्या पालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार..

2


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

१८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीतील पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
डोंबिवलीत शहर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. त्यातच आता १८ वर्षाखालील अल्पवयीन मुले सरार्सपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.

तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे.आणि जे कोणी पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे. याच बरोबर अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये आसे आवाहन देखील पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Spread the love

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here