Home आपलं शहर पत्नीबरोबर संबंध ठेवायची इच्छा बोलल्याने मित्राचा खून; पोलीसांनी आरोपीला केली अटक..

पत्नीबरोबर संबंध ठेवायची इच्छा बोलल्याने मित्राचा खून; पोलीसांनी आरोपीला केली अटक..

0
पत्नीबरोबर संबंध ठेवायची इच्छा बोलल्याने मित्राचा खून;  पोलीसांनी आरोपीला केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिटवाळ्यातील सावकरनगर परिसरात एका बंद घरात टिटवाळा पोलीसांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. परिसरात दुर्गंधी पसरली होती. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप देशमुख पोना. दर्शन सावळे,पोना. नितिन विशे, पोकॅा. योगेश वाघेरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीसांच्या तपासानंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक होती. ज्या प्लॅटमध्ये महेश साबळे याचा मृतदेह आढळून आला होता. त्या फ्लॅटमध्ये खरात कुटुंबियातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्या फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबीय नाशिकला निघून गेले होते.

२२ सप्टेंबर रोजी आरोपी सागर खरात आणि त्याची पत्नी आणि मुलांसोबत टिटवाळा येथील सावकरनगरला परतला. या दरम्यान एके दिवशी रात्री त्याच्या घराखाली त्याचा जुना मित्र महेश साबळे त्याला भेटला. दोघांनी दारु पार्टी केली. हॉलमध्ये दारु पार्टी सुरु असताना महेश साबळे याने सागरला सांगितले की मला तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवायचे आहे. हे ऐकताच सागरने सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या महेशच्या डोक्यात फोडून मानेवर धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला. अखेर पोलीसांनी सागर खरातला बेडय़ा ठोकल्या आहेत. सागर खरात या आधीही वांगणीतील एक हत्ये प्रकरणात जेल भोगून आला आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने टिटवाळा पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणत आरोपी सागर खरात याला नाशिकहून अटक केली आहे. मयत तरुणाचे नाव महेश साबळे असे होते.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here