
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील भोपर गावात असणाऱ्या खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. आज सकाळी हा प्रकार घडला असून काही मुलं या खदाणीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. चार मुलांना बाहेर काढले. तर दोघा मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खदाणीबाहेर गावकऱ्यांची गर्दी झाली असून हळहळ व्यक्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

डोंबिवलीजवळील भोपर गावातल्या गावदेवी मंदिरामागे असणाऱ्या या खदाणीत आयरे गावातील पाच सहा मित्र पोहायला उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले आणि त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. ज्याचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी खदाणीजवळ धाव घेतली. भोपर गावातील खदणीत बुडून दोघे बुडाले तर तिघांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.
tayawin https://www.tayawinch.net
vipjili https://www.vipjiliji.com
fg777link https://www.befg777link.com