Home आपलं शहर ‘मशाल’ निवडणूक चिन्हं ठाकरेंची तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाची..

‘मशाल’ निवडणूक चिन्हं ठाकरेंची तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाची..

0
‘मशाल’ निवडणूक चिन्हं ठाकरेंची तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’  शिंदे गटाची..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना तात्पुरते मशाल हे चिन्हं दिले असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे पक्षाचे नाव दिले आहे तर निवडणूक चिन्हं कोणाचे ते उद्यापर्यंत म्हणणे मांडा असे सांगितले.

शिवसेनेतील अंतर्गत भांडणामुळे दोन दिवसांपूर्वी धनुष्यबाण चिन्हं आयोगाने गोठवले तर शिवसेना हे नाव वापरण्यास ही बंदी घातली होती.आज दुपारी बारा पर्यंत नवीन नावे आणि चिन्हं सुचविण्यासाठी सांगितले होते.

त्यानुसार ठाकरे आणि शिंदे गटाने आपली नावे आणि चिन्हे सुचवली होती, त्यानुसार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नाव ठाकरे गटाला देण्याचे मान्य करीत मशाल हे चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा आदेश आयोगाने संध्याकाळी उशिरा जाहीर केला आहे.

शिंदे गटाने सुचवलेले एकही चिन्हं आयोगाने मान्य केले नसून आणखी चिन्हे सुचविण्यासाठी सांगितले आहे, मात्र पक्षाचे नाव म्हणून बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यास मान्यता दिली आहे.

त्रिशूळ आणि गदा ही चिन्हं आयोगाच्या यादीत नाहीत , तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडू च्या द्रमुक पक्षाचे चिन्हं आहे त्यामुळे ही सर्व चिन्हं आयोगाने नाकारली आणि मशाल हे चिन्हं पुढील आदेशपर्यंत वापरण्यास ठाकरे गटाला परवानगी दिली आहे मात्र शिंदे गटाने आणखी चिन्हे सुचावावित असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here