
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन गुगलने ट्रान्सलेशन सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटलेले दिसत आहेत. गुगल सर्च इंजिन हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते. गुगलने चीनमध्ये ट्रान्सलेशन सर्विस बंद केली आहे.
गुगलच्या या निर्णयामुळे शेजारील देशाच्या कंपनीची सेवा मर्यादित झाली आहे. चीनमध्ये ‘ट्रान्सलेट वेबसाईट’ ओपन केल्यानंतर आता एक ‘जेनेरिक गुगल सर्च बार’ दिसत आहे. यावर क्लिक केल्यानंतर यूजर्स हाँगकाँगची गुगल ट्रान्सलेशन वेबसाइटवर पोहोचतात. परंतु, चीनी यूजर्स हाँगकाँगची ट्रान्सलेशन वेबसाइटचा वापर करू शकत नाही. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, चीनमध्ये अमेरिकी टेक कंपनीने ट्रान्सलेशन सर्विसला कमी वापर होत असल्याने बंद केले आहे.
गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीने चीनमध्ये कमी वापर होत असल्याने गुगल ट्रान्सलेट ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट मध्ये सर्वात मोठी ट्रान्सलेशन सर्विसला चीनमध्ये ५.३५ कोटी हिट मिळाले होते. गुगलने २०१७ मध्ये चीनमध्ये ‘ट्रान्सलेशन ऍप’ लाँच केले होते. चीनी यूजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने प्रसिद्ध चीनी अमेरिकी रॅपर एमसी जिनकडून जाहिरात सुद्धा केली होती. चीनमध्ये गुगल ट्रान्सलेशन सर्विस अचानक बंद करण्यात आल्याने काही चीनी ॲप्लिकेशनवर परिणाम झाला आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/lv/register?ref=SMUBFN5I
taya777login https://www.wtaya777login.com
playpal77 https://www.playpal77sy.org