
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर आज बाळासाहेबांच्या शिवसेनेने अखेर कब्जा मिळवला. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये या शाखेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ही शाखा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांमध्ये डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची ? यावरून दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात राडा झाला होता व गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे सामंजस्याने दोन भागात विभाजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी दोन्ही गटातील हा वाद पुन्हा उफळला. ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या आधीपासूनच या कार्यालयाच्या जागेची विक्री करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेने हे कार्यालय अखेर कायदेशीर बाबी पूर्ण करत आपल्या ताब्यात घेतले आहे, असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले.
यावेळी शिंदे गटातील राजेश कदम, नगरसेवक महेश पाटील, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, रमेश म्हात्रे, संजय पावशे, रणजित जोशी, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे आदी नगरसेवक तसेच उपशहरप्रमुख अमित बनसोडे आपल्या कार्यकर्त्यांसह मध्यवर्ती शाखेत येऊन बसलेले निदर्शनास आले.
777phl casino https://www.777phl.org
jl16login https://www.adjl16login.net