
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये २५ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली नावाच्या गुन्हेगारानी मोफत जेवण घेण्यासाठी हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला.
हॉटेल चालकांनी या गुन्हेगारांचा काटा काढण्यासाठी युक्तीचा उपयोग करत या गुन्हेगारांना मोफत जेवण दिले. आरोपी चाकू दाखवून धमकावत असल्याचे पोलीसांना सांगितले. व्यापाऱ्याची तक्रार येताच कोळसवाडी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन या आरोपाची चौकशी केली.
आरोपीकडून धारदार हत्यार पोलीसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी कोळसेवाडी पोलीसांनी हॉटेल बाहेरच या आरोपीची चांगलीच धुलाई केली. वारंवार पोलीसात तक्रार देऊन फक्त दिखावाची कारवाई पोलीसांकडून होत आहे. प्रत्येक वेळी हा आरोपी दोन दिवसात सुटून येऊन पुन्हा परिसरात दहशत माजवत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या पोलीसांनी या आरोपीवर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.
jiliokcc https://www.jiliokccw.com
phtaya1 https://www.phtaya1.org