
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबईहून ट्रेन ने पळून जाणाऱ्या चोरट्यास नासिकरोड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पायधूनी पोलीस स्टेशन मुंबई भादंवी कलम ४०८ अनुसार गुन्ह्यातील आरोपी संदीप अशोक कुमार शुक्ला (वय ३२) रा. गोंडा, उत्तर प्रदेश हा २८ लाख रुपये रोख घेऊन पळाला असुन तो ट्रेनने जात असल्याची माहिती पायधूनी पोलीस स्टेशन कडून नासिक रोडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली. अनिल शिंदे यांनी त्वरित गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना सूचना दिल्या. अंमलदार शिंदे, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी त्वरित पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस मध्ये जीआरपी इगतपुरी चे पोलीस अंमलदार योगेश पाटील यांच्याशी संपर्क करुन आरोपीची माहिती दिली आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकात गाडी पोहोचताच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलीसांना बघून नागरिक घाबरून हैराण झाले, काय झाले ते लोकांनां समजेना, पोलीसांना बघून आरोपी पळत सुटला तेवढ्यात पोलीसांनी त्याला शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले. आरोपी संदीप शुक्ला याच्या कडे चोरी केलेले संपूर्ण २८ लाख रुपये पोलीसांना मिळाले आहेत. पायधूनी पोलीस ठाण्यात याबाबत नासिक रोड पोलीसांनी कळवले असुन पायधूनी पोलीस ठाण्यातील पथक आल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरक्षक यांनी केलेल्या त्वरित हालचालींमुळे आरोपीला पकडण्यास यश आले असे प्रसिद्धी माध्यमांना आले आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
bet777app https://www.bet777appv.org
bk8casino https://www.bk8casinovs.com
99boncasino https://www.99boncasino.net
slotphlogin https://www.exslotphlogin.net
philucky https://www.usphilucky.org