
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी सध्या कमी न होता दिवसागणिक आणखीणच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी ठाणे येथील ‘विवियाना मॉल’ मधील चित्रपटगृहात गोंधळ घालत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावले होते. प्रसंगी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असता जामीनावर सध्या त्यांची सुटका झाली आहे. आता नव्याने आव्हाड अडचणीत आले आहे ते एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे, याप्रकरणी पुन्हा एकदा आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कळवा खाडी पुलाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जितेंद्र आव्हाड तसेच तक्रारकर्ती महिला देखील उपस्थित होती. सदर महिला ४० वर्षीय असून त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. यावेळी बाजूला व्हायला सांगताना या महिलेला जितेंद्र आव्हाडांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे महिलेचे म्हणणे आहे, त्यामुळे मुंब्रा पोलीस स्थानकात जितेंद्र आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
एकंदरीतच केवळ आठवडाभरातच दुसऱ्यांदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाल्याने ते चांगलेच चर्चेचा मुद्दा बनले आहे. यावेळी एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने हे प्रकरण जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आव्हाडांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेला नक्कीच धक्का पोहचणार असून, काळिमा फासला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी राष्ट्रवादीच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
99boncasino https://www.99boncasino.net
pagcor https://www.ngpagcor.net
okbet15 https://www.okbet15.org
fb777login https://www.fb777loginv.org