Home आपलं शहर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..

0
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर वाहतूक उपविभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकल तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार व त्यांच्यासोबत असलेले वॉर्डन यांच्या कडून शहाड रेल्वे स्टेशन, शहाड जकात नाका, म्हारळ जकात नाका, शांतीनगर, उल्हास नगर रेल्वे स्थानक, सतरा सेक्शन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दंडात्मक कारवाईतून एकूण ९९२ चलन आकारणी करण्यात आली असून सरकारी तिजोरीत ९,९१,०५० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here