Home आपलं शहर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची करडी ‘नजर’ ; मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार भाजपचे तीन नेते..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची करडी ‘नजर’ ; मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार भाजपचे तीन नेते..

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची करडी ‘नजर’ ; मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार भाजपचे तीन नेते..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौ-यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार, खासदार, मंत्री तसंच शिवसेना पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. पण या अयोद्धा दौ-यावर भाजपाची नजर असणार असुन भाजपाचे तीन मंत्री देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे भाजपाचा एकनाथ शिंदे यांच्यावर कायम वॉच राहणार आहे.

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आहेत. पण राजकारणात काहीही होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून भाजपा कायमचं एकनाथ शिंदे यांच्यावर नजर ठेऊन असते. मुख्यमंत्र्याच्या काही कार्यक्रमात तर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसतो पण भाजपाचा कोणतातरी नेता किंवा आमदार कायम असतो त्यामुळे भाजपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वॉच ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.

आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी जात असताना भाजपचे नेतेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही अयोध्येमध्ये जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय कुटे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जातील. संजय कुटे यांची ओळख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर भाजपाचे लक्ष असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, कार्यकर्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत.

शरयू नदीवर महाआरती करून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता होणार आहे. शिवसैनिक याआधीच स्पेशल ट्रेनने अयोध्येला पोहोचले आहेत. राज्यात यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भाजपाकडून मंत्री रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे देखील गेले होते. त्यावेळी यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here