Home आपलं शहर अनैतिक संबंधाच्या वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना मानपाडा पोलीसांनी केली ०३ तासात अटक..

अनैतिक संबंधाच्या वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना मानपाडा पोलीसांनी केली ०३ तासात अटक..

1
अनैतिक संबंधाच्या वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना मानपाडा पोलीसांनी केली ०३ तासात अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली येथील पुलाची वाडी येथे राहणारे मारूती लक्ष्मण हांडे (वय ५५ वर्षे) यांचे संध्या सिंग नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी दर्शन चाळ, कोळेगाव, डोंबिवली (पूर्व) येथे ०१ वर्षांपासून राहत होते. संध्या सिंग हिचे सदर भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचेत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सदरची बाब मारुती हांडे यास माहिती झाल्यानंतर त्याच्यात व संध्या सिंग यांचे वाद होवू लागले. त्याने अनेक वेळा संध्या सिंग हिला समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांच्यातील प्रेम सबंध सुरूच होते. त्यामुळे मारुती हांडे हा नेहमी संध्या सिंग हिच्याशी वाद घालू लागला, त्यामुळे संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमतील अडसर दूर करण्यासाठी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान आखला. त्याचप्रमाणे दिनांक २२/०४/२०२३ रोजी मारुती हांडे हा दुपारी त्याच्या घरात जात असताना, वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात, हातावर, पायावर, स्टंम्पने मारहाण केली त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे यास मारण्यासाठी वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याला प्रोत्साहन दिले. वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात स्टंम्पने जोरजोरात उपट घालून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर संध्या सिंग हिने वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याच्या मदतीने मारुती हांडे यास कोळेगावातील ‘ज्ञानदेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ येथे दवाउपचारसाठी दाखल केले असता त्यावेळी त्यास कोणी मारले याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना काहीही माहिती दिली नाही, मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यास पुढील उपचारासाठी कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले. त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे याच्या पत्नीस फोन करून मारुती हांडे यास कोणीतरी जबर मारहाण केली असून, त्यास आम्ही कळवा येथे हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याची माहिती देवून सदर ठिकाणी बोलावुन घेतले. त्यावेळी मारुती हांडे याची पत्नी, मुलगा व भाऊ असे हॉस्पीटलमध्ये आले असता, संध्या सिंग हिने मारुती हांडे यास कोणी मारले याची काहीएक माहिती न देता जखमीचे केस पेपर मारुती हांडे याच्या पत्नीकडे देवुन हॉस्पीटलमधून गपचुप पोबारा केला.

जखमी मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने, त्यास पुढील उपचारासाठी मुंबई येथील ‘सर जे.जे.रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना तो दिनांक २३/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.१५ वा. मयत झाला. त्याच्या मृत्युबाबत मानपाडा पोलीस ठाण्याला माहिती मिळताच सदर गुन्ह्याचा प्रकार हा गंभीर असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ०३ टिम तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांचा त्यांच्या पत्त्यावर शोध घेतला असता ते त्यांचे घरी सापडले नाहीत. सदर आरोपींचा वेगवेगळया पध्दतीने शोध घेण्यात आला असून, सदर आरोपी यांचा कोणताही सुगावा किंवा मागमूस नसताना त्यांचा अथक प्रयत्नांनी व कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता सदर दोन्ही आरोपी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधात मारुती हांडे हा अडथळा निर्माण करीत असल्याने, त्यांनी त्याचा काटा काढल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि (कल्याण) दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहेकाँ. सोमनाथ टिकेकर, सुनिल पवार, संजय मासाळ, शिरीष पाटील, पोना. प्रविण किनरे, अनिल घुगे, गणेश भोईर, पोकाँ. अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Spread the love

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here