
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री.सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्याचे श्री.सुरेश मदने, पोनि. (प्रशासन) अतिरिक्त कार्यभार व पोनि यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विषेश पथक स्थापन करून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मार्गदर्शन करून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपी येण्या-जाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून तसेच गोपनिय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत घेवून सराईत गुन्हेगार नामे युसुफ रशीद शेख (वय: ३८ वर्ष), व नौशाद मुश्ताक आलम उर्फ सागर (वय:२८ वर्ष), यांना ताब्यात घेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ४३४/२०२३, भादंवि कलम ४५४,३८०,३४ या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडुन ठाणे शहर, नवीमुंबई व मुबई आयुक्तालयतील १८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदर अटक आरोपींकडुन २०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, २,२०,५००/- रूपये रोख रक्कम, ०२ मोटार सायकल, ०२ लॅपटॉप, ०८ मोबाईल, ०५ मनगटी घडयाळ, ०१ कॅमेरा, ०१ स्पिकर, ०१ एटीएम कार्ड, ०१ नंबर प्लेट, ०१ हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, व चाकू असा एकुण २०,१५,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
अटक केलेले दोघे आरोपी हे अट्टल तसेच सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तलयात आरोपी युसूफ शेख याला एकुण २३ गुन्ह्यात व आरोपी नौशाद आलम याला एकुण ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्षनाखाली श्री. सुरेश मदने,पोनि(प्रशासन)अतिरिक्त.कार्भार व पोनि, सपोनि.सुनिल तारमाळे, सपोनि. अविनाश वणवे, सपोनि. प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, सोमनाथ टीकेकर, पोना. गणेश भोईर, शांताराम कसबे, प्रविण किनरे, देवा पवार, येलप्पा पाटील, अनिल घुगे, पोशि. विजय आव्हाड, अशोक आहेर, महेंद्र मंजा, संदीप चौधर यांच्या पथकाने यशस्वीरित्या केलेली आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/en-NG/register?ref=YY80CKRN
okbet15 https://www.okbet15.org
pesomaxfun https://www.elpesomaxfun.com
nustar online https://www.etnustar-online.com
peryaplus https://www.rsperyaplus.net