Home आपलं शहर *राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—- डॉ. संतोष पाटील*

*राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—- डॉ. संतोष पाटील*

13
*राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—-  डॉ. संतोष पाटील*

अहमदपूर:-
मासूम शेख

जगातल्या विद्वानांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे मोठे योगदान असून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची खरी प्रेरणा जिजाऊंनी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिजाऊंना आपल्या पूर्वजांकडून मिळालेले संस्कार हे सैनिकाचे होते. तेच संस्कार त्यांनी शिवबावर आणि शिवबांच्या सोबत असलेल्या बाल मावळ्यांवरही केले. शिवबांना स्वराज्याचे बाळकडू जिजाऊंकडून मिळाले. जिजाऊंनी शिवबांना लष्करी शिक्षण दिल्यामुळेच ते स्वराज्य निर्माण करू शकले, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवबांच्या स्वराज्याला आकार दिला तसेच शिवरायांचा राज्यकारभार रयतेसाठी आदर्श ठरावा यासाठीही प्रयत्न केले. तसेच स्वामी विवेकानंदांनी युवकांना ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा दिली, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले. प्रास्ताविक ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

13 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here