Home आपलं शहर *सामाजिक परिवर्तनात समाजसुधारकांचे मोठे योगदान – डॉ. मारोती कसाब*

*सामाजिक परिवर्तनात समाजसुधारकांचे मोठे योगदान – डॉ. मारोती कसाब*

6
*सामाजिक परिवर्तनात समाजसुधारकांचे मोठे योगदान – डॉ. मारोती कसाब*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारताला संत, महंत, कलावंत, विचारवंत आणि समाज सुधारकांची मोठी परंपरा लाभलेली असून, भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात समाज सुधारकांचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन डॉ.मारोती कसाब यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या निवासी युवक शिबिरात मौजे हासरणी ता. अहमदपूर येथील उद्बोधन कार्यक्रमात डॉ. कसाब बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. कसाब म्हणाले की, भारतातील संत, विचारवंत आणि समाज सुधारकांनी केलेले सामाजिक परिवर्तन हा जगाच्या अभ्यासाचा विषय झाला आहे. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा कबीर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदींनी भारतीय समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. आधुनिक काळात राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन चळवळीत दिलेले योगदान लक्षणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, भारतीय समाजाला मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची आवश्यकता असून अज्ञान, अंधश्रद्धा, भेदभाव, शोषण या सर्वांविरुद्ध लढण्यासाठी महामानवांच्या विचारांची आज मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली असून, सामाजिक चळवळींची गरज आहे असेही ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी केले. तर आभार प्रसाद शिंदे यांनी मानले. यावेळी शिबिरार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

6 COMMENTS

  1. Yo, mk7k’s got a decent selection. Been kicking around there for a bit. Nothing crazy, but solid for a casual spin now and then. Check it out at mk7k.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here