Home गुन्हे जगत पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख बाबत 100 कोटी वसुलीचा केलेला दावा खोटा?

पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख बाबत 100 कोटी वसुलीचा केलेला दावा खोटा?

0
पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख बाबत 100 कोटी वसुलीचा केलेला दावा खोटा?

मुंबई, प्रतिनिधी : सचीन वाझे प्रकरणात रोज नवनविन खुलासे होत असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली. अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं, असा आरोप परमवीर सिंह यांनी एक पत्रातून केला होता. त्यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे एका नामांकित वर्तमानपत्राच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावलं. मात्र ज्या दिवशी सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. तसंच त्यावेळी देशमुख यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे.
या कागदपत्रांमुळे आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांच्या दाव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

त्याच प्रमाणे परमबीर सिंह यांनी जर हा विषय माहीत होता तर त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत का केलं नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेला दावा खरा की खोटा? याची सखोल चौकशी झाल्यानंतर नंतर समोर येणार आहे.

दरम्यान, ही कागदपत्रे समोर आल्यानंतर परमवीर सिंह यांनी अद्याप कोणतीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया दिलेली नाही. आता ते या विषयावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here