Home गुन्हे जगत बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

0
बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

 

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई येथे बनावट कॉलसेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला मालाड आणि बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, मालाड व बांगूर नगर पोलीस ठाणे परिसरातील बनावट कॉल सेंटर मधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मालाड आणि बांगूर नगर पोलिसांनी संयुक्तरित्या एकूण ३ बोगस कॉलसेंटरवर छापा टाकून केलेल्या कारवाईत एकूण ४५ संगणकाची हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप, २८ मोबाईल, राऊटर्स आणि इतर साहित्य हस्तगत करून एकूण १० इसमांना अटक केली आहे.

यामध्ये मालाड पोलीस ठाणे हद्दीतील लोटस बिजनेस पार्क, राम बाग लेन, एस.व्ही.रोड, मालाड (प) या ठिकाणी केलेल्या कारवाईत अमेरिकेत स्थित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना व्हिआग्रा व इतर औषधांची विक्री करत असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या तीन इसमांना अटक केली.

तसेच बांगूर नगर पोलीस ठाणे हद्दीत पाम स्प्रिंग, लिंक रोड, मालाड (प) या ठिकाणी केलेल्या कारवाईत परदेशी नागरिकांना सॉफ्टवेअर व तत्सम वस्तूंची विक्री करून त्यांना पैशाची मागणी करून त्याचे रोखीकरण करून आर्थिक लाभ मिळविणाऱ्या ४ इसमांना अटक केली.

त्यानंतर पाम स्प्रिंग इमारतीमधील आणखी एका कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत अमेरिकेत स्थित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना व्हिआग्रा व इतर औषधांची विक्री करत असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करून त्याचे रोखीकरण करून आर्थिक लाभ मिळविणाऱ्या चार इसमांना अटक केली.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here