Home गुन्हे जगत कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सुट्टी; त्याच्या मृत्यूची ठरली होती अफवा !

कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सुट्टी; त्याच्या मृत्यूची ठरली होती अफवा !

0
कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सुट्टी; त्याच्या मृत्यूची ठरली होती अफवा !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये छोटा राजनला दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे.

गुन्हेगारी जगतामध्ये अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्याला एम्स रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. छोटा राजनला एप्रिलध्ये कोरोना झाल्याचे निदान झाले होते. एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये छोटा राजनला दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे.

विविध गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉनची रुग्णालयामधून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. नुकतेच त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला खुनाच्या प्रयत्नाच्या खटल्यात दहा वर्षाच्या तुरुंगवासाची मार्च २०२१ मध्ये शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये अजय गोसालिया या बुकीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोर्टाने छोटा राजनला दहा वर्षांची शिक्षा सुनावली.

पत्रकार जे डे खून प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा

राजेंद्र निकळजे उर्फ ​​छोटा राजन नावाचा हा कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सह-आरोपींसह दोषी आढळला. त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तक्रारदारानुसार, ५२ वर्षीय अजय गोसालिया उर्फ ​​गेंडा प्रथम बुकी होता. नंतर तो बिल्डर बनला. २८ ऑगस्ट २०१३ रोजी त्याला तीन जणांनी गोळ्या घातल्या. हा हल्ला मुंबईतील मालाड मधील इन्फिनिटी मॉल बाहेर करण्यात आला होता. राजनला बाली येथून भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. छोटा राजनला यापूर्वी पत्रकार जे डे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here