Home आपलं शहर महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

0
महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

संपादक: मोईन सय्यद / कल्याण प्रतिनिधी: गुलाब शेख

कल्याण येथील कचोरे गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू उचलण्या साठी रस्त्यावर धावत गेलेल्या 12 वर्षीय मुलाला मागून येत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता त्याला ताबडतोब उचलून रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 12 वर्षांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here