Home आपलं शहर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या वादतून जोरदार हाणामारी; हाणामारी ची घटना सीसीटीव्हीत कैद..

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या वादतून जोरदार हाणामारी; हाणामारी ची घटना सीसीटीव्हीत कैद..

0
भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या वादतून जोरदार हाणामारी; हाणामारी ची घटना सीसीटीव्हीत कैद..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राजकीय श्रेयातून हाणामारी

काही महिन्यांत बदलापूर कुळगाव नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सध्या लसीकरण केंद्रांवर सर्वच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. सेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशाच लसीकरणाच्या वादातून पालिकेच्या दुबे रुग्णालयात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी बेंच टाकला. त्यात एक जण जखमी झाला आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल

याप्रकरणी भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांकडून बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारे लसीकरणावरून राजकीय संघर्ष यापुढेही वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here