Home आपलं शहर देशमुख पिता-पुत्राला पुन्हा ‘ईडी’ कडून समन्स..

देशमुख पिता-पुत्राला पुन्हा ‘ईडी’ कडून समन्स..

0
देशमुख पिता-पुत्राला पुन्हा ‘ईडी’ कडून समन्स..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लाँड्रिग’ प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ‘ईडी’ आणखी एकदा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत ते जारी केले जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

‘ईडी’ने गेले दोन दिवस देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली आहे. त्या अनुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार आहे. महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ‘ईडी’चा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे. त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले. मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here