Home आपलं शहर नवी मुंबईत ड्रग्ज तस्करांचा ‘एनसीबी’च्या पाच अधिकाऱ्यांवर गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर..

नवी मुंबईत ड्रग्ज तस्करांचा ‘एनसीबी’च्या पाच अधिकाऱ्यांवर गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर..

0
नवी मुंबईत ड्रग्ज तस्करांचा  ‘एनसीबी’च्या पाच अधिकाऱ्यांवर  गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘एनसीबी’ (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने गेल्या आठवड्यात पोटातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक करून १० कोटींचे कोकेन जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री ‘एनसीबी’ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. दरम्यान ड्रग्ज तस्कर गॅंगकडून ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात ‘एनसीबी’चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच यातील एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनसीबी’ कडून समोर आली आहे.

नवी मुंबई भागात ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे पसरले असल्याची गुप्त माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशीरा संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मात्र, ड्रग पेडलरनं ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल चढवला. या हल्ल्यात ‘एनसीबी’चे ५ अधिकारी जबर जखमी झाले आहेत. तसेच एका अधिकाऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या कारवाईत ‘एनसीबी’ने ड्रग्ज तस्कर गॅंगच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी एक विदेशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त केले आहे. ही माहिती ‘एनसीबी’चे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ड्रग्ज तस्कर तिवरांच्या झाडांची मदत घेत फरार झाले आहेत. अन्य फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे असे एनसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here