Home आपलं शहर सरकारने केली तिकीट दारात ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ; विमान प्रवास महागणार..

सरकारने केली तिकीट दारात ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ; विमान प्रवास महागणार..

0
सरकारने केली तिकीट दारात ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ; विमान प्रवास महागणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशांतर्गत आता विमान प्रवास हा महागणार आहे. सरकारने केवळ दोन महिन्यांतच सलग दुसऱ्यांदा देशांतर्गत विमान तिकीटांच्या किंमती ९ ते १२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. नागरी उड्डान मंत्रालयाने नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीतील उड्डाणांच्या तिकिटांची किंमत ₹ २६०० वरून ₹ २९०० करण्यात आली आहे. सदर किंमतीत तब्बल ११.५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे.

तर, ४० मिनिटांच्या प्रवासासाचे जास्तीत जास्त भाडे १२.८२ टक्क्यांनी वाढवून ₹ ८८०० करण्यात आले आहे. ४० ते ६० मिनीटांच्या प्रवासासाठीचे कमीत कमी भाडे ₹ ३३०० रुपयांएवजी ₹ ३७०० असेल. यामध्ये १२.२४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून शुक्रवारपासून जास्तीत जास्त भाडे हे ११ हजार रुपये असेल. याशिवाय ६० ते ९० मिनीटांच्या प्रवासाचे कमीत कमी भाडे ₹ ४५०० असेल.

यामध्ये १२.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, जास्तीत जास्त भाड्यात १२.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून ते ₹ १३२०० असेल. मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता ९०-१२०, १२०-१५०, १५०-१८० आणि १८०-२१० मिनिटांच्या देशांतर्गत प्रवासासाठी कमीत कमी भाडे अनुक्रमे ५३०० रुपये, ६७०० रुपये, ८३०० रुपये आणि ९८०० रुपये असेल. १२०-१५० मिनिटांच्या प्रवासासाठीच्या कमीत कमी भाड्याच्या किमतीत ९.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ते ६७०० रुपये करण्यात आले आहे.

वास्तविक तिकीट दर जास्त असणार

वास्तविक तिकीट दर या दरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये प्रवासी सुरक्षा शुल्क (passenger security fee), विमानतळावरील इतर चार्जेस आणि वस्तू आणि सेवा कर यांचा समावेश नाही. विमान भाड्याच्या मर्यादेत यंदा चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी फेब्रुवारी, मे आणि जूनमध्ये तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here