Home गुन्हे जगत नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली होती हत्या; मारेकऱ्या चौकडीला मानपाडा पोलिसांनी शिताफीने केले अटक..

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली होती हत्या; मारेकऱ्या चौकडीला मानपाडा पोलिसांनी शिताफीने केले अटक..

0
नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली होती हत्या; मारेकऱ्या चौकडीला मानपाडा पोलिसांनी शिताफीने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनी नुकताच उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे उपलब्ध नसतानाही मानपाडा पोलिसांनी केवळ एका कॉलच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

११ सप्टेंबरला दुपारी १२:०० च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी.एस. होरे यांना आढळून आले होते. कृष्णमोहन तिवारी (वय वर्षे ४७) असे या व्यक्तीचे नाव असून रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला. मात्र त्याच्याकडे असणाऱ्या आधारकार्ड वरून त्याचे नाव आणि घराचा मिळवत मानपाडा पोलिसांनी घरी चौकशी केली. मात्र पोलीसांना त्यातही विशेष असे काहीच आढळून आले नाही. परंतू त्याच्या मुलीने सकाळी १०:३० च्या सुमारास एक फोन आला आणि त्यानंतर वडील घराबाहेर पडले अशी माहिती पोलीसांना दिली. त्याआधारे पोलीसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत पोलीसांनी या सर्व खुनाच्या हत्येचा उलगडा केला.

मयत कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे कतार मधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका ‘प्लेसमेंट सेंटर’ कडे त्याने आपली माहिती दिली होती. या ‘प्लेसमेंट सेंटर’ मधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने याने त्याला मोबाईलवर संपर्क केला होता आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याण झोन-३ चे उपयुक्त श्री. विवेक पानसरे यांनी पत्रकारांना दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने पुढील तपास मानपाडा पोलीसांकडून सुरू असल्याचे सांगितले.

डोंबिवलीचे एसीपी जयराम मोरे, मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, पोलीस हवालदार काटकर, कदम, चौधरी, पोलीस नाईक यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस.गाडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर.जी.खिलारे, कोळी, मंझा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असे झोन-३ चे डीसीपी विवेक पानसरे यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here