Home आपलं शहर पोळी-भाजी चा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या..

पोळी-भाजी चा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या..

0
पोळी-भाजी चा व्यवसाय करणाऱ्या  मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने जुन्या मैत्रिणीच्या घरी झोपायला आलेल्या मैत्रिणीनेच त्या ५८ वर्षीय महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले असून या महिलेचे शेलार नका येथे स्वतःचे पोळी भाजी केंद्र असल्याचे उघड झाले आहे.

पाथरली येथे राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा खोपडे या महिलेने टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर (५८ वर्षे) यांच्याशी दुपारी संवाद साधला असता मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया बावीस्कर यांना सांगितले. त्यावर विजया बाविस्कर यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा खोपडे ही महिला विजया बावीस्कर यांच्याकडे झोपायला आली होती. रात्री त्याचदरम्यान विजया बाविस्कर यांच्या अंगावरचे दागिने चोरून आरोपी सीमा खोपडे हिने विजया बावीस्कर यांचा गळा दाबून हत्या केली आहे.

या प्रकरणाचा शोध अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, प्रवीण बाकले, धोंडे, मुंजाल यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात येत आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here