Home आपलं शहर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील विनापरवाना रात्रभर चालणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करा अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी..

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील विनापरवाना रात्रभर चालणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करा अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी..

0
बदलापूर, अंबरनाथ,  कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील विनापरवाना रात्रभर चालणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करा  अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली सह आसपासच्या शहरांमध्ये सुरू असणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे.कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांनी आज कल्याणात बैठक घेतली.

गेली २ वर्षे आधीच कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणतेही उत्पन्न नसतानाही लाईट बिल, कामगारांचा पगार, शासनाचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. तर कोवीड निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक गाडा चालण्यास आताशी कुठे हालचाल सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरात सुरू झालेल्या अनधिकृत ढाब्यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आवाहन उभे केले असल्याचे यावेळी बोलताना विविध हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

तर आम्ही सर्व जण शासनाचे रीतसर सर्व कर, देयके भरत आहोत. याउलट कोणतेही शासन शुल्क किंवा परवानगी न घेता अनधिकृत ढाबे सर्रासपणे राजरोज दिवसरात्र सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे ? असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. तसेच या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

आम्ही दिसायला जरी मोठे हॉटेल व्यावसायिक दिसत आहोत, तरी अनेक जणांचा रोजगार व  सरकारी कर भरून सर्व नियमावली पाळतो. जे अनधिकृत ढाबे आहेत त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय, हे ढाबे तातडीने बंद करावेत, एवढीच आम्हा हॉटेल व्यावसायिकांची कळकळीची विनंती आहे असे उल्हासनगर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव श्री. नरेश कंडारे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हॉटेल व्यावसायिकांचा व्यथा मांडली.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here