Home आपलं शहर डोंबिवली पश्चिमेतील शहर वाहतूक शाखेची बावन चाळ या ठिकाणी बंद असलेली चौकी पुनश्च सुरू करण्यासाठी माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्याकडून वरिष्ठांना निवेदन..

डोंबिवली पश्चिमेतील शहर वाहतूक शाखेची बावन चाळ या ठिकाणी बंद असलेली चौकी पुनश्च सुरू करण्यासाठी माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्याकडून वरिष्ठांना निवेदन..

0
डोंबिवली पश्चिमेतील शहर वाहतूक शाखेची बावन चाळ या ठिकाणी बंद असलेली चौकी पुनश्च सुरू करण्यासाठी माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्याकडून वरिष्ठांना निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगरातील बावन चाळ या ठिकाणी असलेली डोंबिवली शहर वाहतूक शाखेची चौकी बंद पडलेले असून माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्यातर्फे डोंबिवली शहर वाहतूक शाखा वरिष्ठांना चालू करण्याचे विनंतीपूर्वक निवेदन आदरणीय पोलीस विभागाचे वरिष्ठांना सादर संस्थेद्वारे देण्यात आले.

कल्याण डोंबिवली या ठिकाणी वाहनांची संख्या खूप वाढल्याने कोपर ब्रिज पूर्व-पश्चिम या ठिकाणी कधीकधी वाहतूक कोंडी होत राहते. त्यासाठी त्या वेळेला त्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसतात व बीट मार्शल त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. जर बावन चाळ या ठिकाणी असलेली डोंबिवली शहर वाहतूक शाखेची चौकी कर्मचारी देऊन चालू केल्यास वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होण्याची तसेच नागरिकांना आणि प्रवाशांना कमी प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे त्यासाठी वरिष्ठांना विनंती करत लवकरात लवकर सदर चौकी चालू करण्यात यावी याकरिता माहिती अधिकार महासंघ (ठाणे) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठांना विनंती करत निवेदन देण्यात आले.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here