Home आपलं शहर बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

0
बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे तंबाखू छोडो अभियान!

मुंबई: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था तसेच शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, याच दिनाचे औचित्य साधून मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने बोरिवली स्थानकात डॉक्टर व नर्सेस यांनी” तंबाखु छोडो ‘ अभियान राबविले होते. यावेळी रेल्वे स्थानकातील नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच यावेळी ४० नागरिकांनी तंबाखु सोडण्याची शपथ घेतली.

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. तन्वी शहा म्हणाल्या, ” मुंबई शहरात अनेक नागरिक दाटीवाटीने राहतात त्यामुळे धूम्रपान अथवा तंबाखुचे व्यसन असणारी असंख्यजण आहेत, कधी कधी त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील नकळतपणे व्यसनाच्या आहारी जातात, ३१ मे या दिवशी व्यसन करणाऱ्या नागरिकांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा हाच संदेश आमच्या या उपक्रमाद्वारे दिला गेला.

धूम्रपान तसेच तंबाखूचे व्यसन करणाऱ्या नागरिकांना गंभीर आजार होण्याचा व त्यात मृत्यू होण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत जास्त असतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तंबाखूच्या वापरामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, फुफ्फुसाचा जुनाट आजार आणि मधुमेह यासह चार प्रमुख असंसर्गजन्य रोग होऊ शकतात.”

तंबाखूचे सेवन करणे आणि धूम्रपान करणे आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका उद्भवतो आणि अनेकदा जीवघेणा आजार शरीरात घर करतो. जे लोकं तंबाखूचे सेवन कच्ची तंबाखू, बिडी-सिगारेट, पान मसाला, हुक्का कोणत्याही प्रकारे करत आहेत. त्यांना अशा प्रकारे सेवन केल्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी समजावणे आणि तंबाखू सोडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही; कर्करोग हा त्यातीलच एक आजार आहे! अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल पुढील १५ दिवसात पश्चिम उपनगरात विविध उपक्रम राबविणार आहेत.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here