Home आपलं शहर सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..

सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..

0
सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली  वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या पावसाळा सुरू झाला असून मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे. हे ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ चे अध्यक्ष श्री.विशाल शेटे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचे सहकारी चेतन ठक्कर आणि ‘आयशा आयकॉन’ या गृह-संकुलांचे बांधकाम व्यवसायिक श्री.निमेश सेजपाल यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली आणि या संबंधित शहर वाहतूक शाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमचे ७० वाहतूक कर्मचारी असून यांना रेनकोटची गरज आहे. तात्काळ ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष व ‘आयशा आयकॉन’ चे बांधकाम व्यवसायीक यांनी ७० रेनकोट डोंबिवली शहर वाहतूक शाखेला उपलब्ध करून दिनांक २१/०६/०२२ रोजी माननीय श्री.मंदार धर्माधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते शहर वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या उपस्थितीत डोंबिवली शहर वाहतूक शाखा मध्ये कार्यरत असलेले ७० कर्मचारी आणि वॉर्डन यांना सदर रेनकोट चे वाटप करण्यात आले.

सदर रेनकोट वाटपाचा कार्यक्रम वाहतूक पोलीस विभागाचे उप-आयुक्त श्री.मंदार धर्माधिकारी तसेच वाहतूक उपशाखा डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते यांच्या उपस्थितीत श्री.निमेश सेजपाल, श्री.चेतन ठक्कर आणि श्री.विशाल वि.शेटे यांच्या हस्ते शहर वाहतूक शाखा रामनगर डोंबिवली येथे पार पडला.


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here