Home आपलं शहर शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर..

शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर..

0
शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या खेळीला ‘जशास तसे’ असे चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीला सुरुंग लावत राज्यात भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं. या सर्व सत्तासंघर्षापासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. सेना आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र मागितलं. शिवसेनेच्या या खेळीला शिंदे गटाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय.

ठाण्यात समर्थकांकडून शपथपत्र मोहिम

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात समर्थकांनी शपथपत्र मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पाठिंबा असलेले कार्यकर्ते आणि समर्थक हे शपथपत्र भरण्यासाठी गर्दी करतायेत. शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र भरून देत आहेत. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत.

ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे मानले जात आहे असे सर्वत्र बोलले जात आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here