Home आपलं शहर सोनिया व राहुल गांधी मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता !

सोनिया व राहुल गांधी मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता !

0
सोनिया व राहुल गांधी मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लाँड्रिंग प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांना अटक होऊ शकते. मंगळवार दि. २ ऑगस्टला ‘ईडी’ ने या प्रकरणी १२ ठिकाणी छापे टाकले. या छाप्याआधी ‘ईडी’ ने २ मोठ्या कॉंग्रस नेत्यांची चौकशी केली. या प्रकरणाचा खुलासा करताना भाजप नेता सुब्रामण्यम स्वामी यांनी, लवकरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेल मध्ये जातील व मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना कठोर शिक्षा होईल असे भाकीत वर्तवले.

विदेशी चलनाला भारतीय रुपयांमध्ये केलं रूपांतर

काँग्रेसने आधी यंग इंडिया लिमिटेडचे ५ लाख शेअर भांडवलावर तयार केले आणि नंतर काँग्रेस ९० कोटी रुपयांचे कर्ज एजेएल विकत घेतले आणि त्यात काहीही उरले नाही असे सांगून ते ५० लाख रुपयांना विकत घेतले. राहुल-सोनिया यांना गुन्हेगार ठरवत स्वामी म्हणतात की, एजेएल वर ९० कोटी रुपयांचे कर्ज नव्हते. कंपनीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाले. स्वामींच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी-राहुल गांधी यांनी परकीय चलनात पैसा आणला असावा आणि त्यांनी या फेरफार करून त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले.

सोनिया-राहुल जेल मध्ये जाणार : सुब्रामण्यम स्वामी

सुब्रामण्यम स्वामी यांनी सुरु असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच आतापर्यंत भाजपमध्ये असे काही नेते होते त्यांना सोनिया-राहूल टाळत होते. पण आता व्यवस्थित तपास सुरु असून लवकरच सोनिया-राहुल यांना तुरुंगात जावे लागेल. सुरु असलेल्या युक्तीवादानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये शिक्षा दिली जाईल. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्यापासून हे प्रकरण चर्चेत आले आहे. या पूर्वी राहुल गांधी यांना अनेकवेळा ‘ईडी’ ने कार्यालयात बोलावून तासनतास त्यांची चौकशी केली आहे. सोनिया गांधी यांना देखील तीनदा बोलावून प्रश्नोत्तरे विचारून चौकशी करण्यात आली आहे. तर ही संपूर्ण चौकशी बनावट असल्याचा दावा करत कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर या प्रकरणासंदर्भात दाखल याचिकेत सर्व पुरावे असल्याने ही केस उभी राहिली आहे. या प्रकरणाच्या पुराव्यासाठी अजून काय हवं असं देखील स्वामी यांनी म्हटले आहे.

नेमक प्रकरण काय ?

काँग्रेस पक्षाच्या नेतृवाखाली ‘यंग इंडिअन’ मधील आर्थिक अनियमतेच्या तपासासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ च्या निधीची फसवणूक आणि गैरव्यवहार करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय, ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ ने ९०.२५ कोटी रुपयांच्या वसुलीचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ ५० लाख रुपये दिले होते, जे एजेएल ने काँग्रेसकडे थकवले होते असाही आरोप आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here