Home आपलं शहर भारतीय जनता पार्टी तर्फे मोफत कोरोना बूस्टर डोस च्या शिबिराचे आयोजन..

भारतीय जनता पार्टी तर्फे मोफत कोरोना बूस्टर डोस च्या शिबिराचे आयोजन..

0


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

आज भारतीय जनता पार्टी तर्फे मोफत कोरोना बूस्टर डोस च्या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी टाटा पॉवर संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते झाले.

या शिबिराचे आयोजन मा. नगरसेवक रमाकांत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. या मोफत बूस्टर डोस शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिवाजी आव्हाड यांनी कोरोना या महाभयंकर महामारीची साथ दोन वर्षांपूर्वी सर्व जगभर पसरली होती व असंख्य नागरिकांची या साथीमुळे मृत्यू झाले होते. विश्वविख्यात भारतीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कमी वेळामध्ये लसीचा शोध घेत जगामध्ये एकमेव असं भारत राष्ट्र आहे ज्या देशांमध्ये सर्वाधिक नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात आली असे उद्गार काढले.

नुकताच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ वर्षा वरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर देण्याचे अभियान देशात चालू केले आहे. ‘मोदीजी है, तो मुनकीन है’ ही प्रचिती त्यांच्या कार्यातून आली आहे. आतापर्यंत सर्व लसीवर आपण बाहेरच्या देशातून आयात करून लस द्यायचं प्रथमताच भारतामध्ये अशा प्रकारची कमी वेळात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आणि जगामध्ये सर्वात जास्त नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे, ते राष्ट्र म्हणजे फक्त भारत देश या लसीकरण मोहिमेमुळे भारतामध्ये कोरोनाची साथ आटोक्यात आली आणि नागरिकांचा मृत्यू दर कमी झाला. याबद्दल नरेंद्र मोदी साहेबांचं विशेष अभिनंदन आणि आभार मानण्यात आले. शिबिरास भाजपचे संजय पाटील, श्याम पाटील, संजय दळवी इतर कार्यकर्ते व असंख्य नागरिक या शिबिरास उपस्थित होते. या शिबिरात या योजनेचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here