Home आपलं शहर कोनगाव पोलिसांची धडक कारवाई; सापळा लावत ५५ लाख ४० हजार रुपयांचा राज्यातील प्रतिबंधित गुटका केला जप्त..

कोनगाव पोलिसांची धडक कारवाई; सापळा लावत ५५ लाख ४० हजार रुपयांचा राज्यातील प्रतिबंधित गुटका केला जप्त..

0
कोनगाव पोलिसांची धडक कारवाई; सापळा लावत ५५ लाख ४० हजार रुपयांचा राज्यातील प्रतिबंधित गुटका केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील बासुरी उपहारगृहाजवळ अन्न व औषध प्रशासनासह संयुक्त कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेला ५५ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात भादवि कायदा कलम क्र. १८८, २७२, २७३, ३२८, ३४, २६(२), २७, २३, २६(२)(४), ३०(२)(अ), ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आसिफ रहीम (२८ वर्षे) याला अटक केली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांना आणि अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सापळा रचत ‘बासुरी उपहारगृह’ येथून वाहतूक करणारा एक कंटेनर अडविला. त्यामध्ये ५५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधित असलेला १५० गोणी गुटखा पथकास आढळून आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी कंटेनरचा चालक आसिफ रहीम याला अटक केली आहे व हा गुटखा कुठून आणला गेला व तो कोणाला विक्री करण्यात येणार होता याचा पुढील तपास सुरू आहे असे कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here