Home आपलं शहर ‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महासंचालकांना आदेश..

‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महासंचालकांना आदेश..

0
‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महासंचालकांना आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here