Home आपलं शहर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र..

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र..

0
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

महाराष्ट्रातील लोकांचा अभिमान असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मंजूर करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य सरकारने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र सरकारकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करते असा निष्कर्ष. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

यासंदर्भात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी राष्ट्रपतींना १ लाख २० हजारांहून अधिक पत्रे पाठवली आहेत. याबाबत महाराष्ट्रातील खासदारांनी वेळोवेळी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यसभेत सांगितले. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मंजूर करावा, अशी विनंती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here