Home आपलं शहर भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर यांचा केला सत्कार

भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर यांचा केला सत्कार

0
भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर  यांचा केला सत्कार

मिलन शाह, मुंबई : महाराष्ट्र सारा देश, विश्व कोरोनाच्या संसर्गाने ग्रस्त आहे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे बुडाल्यामुळे सर्वांना त्याची आर्थिक झळ बसली आहे. यामुळेच शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुदानित विनाअनुदानित काळातील विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र चालू आहे या ऑनलाईन शिक्षणामुळे आज शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणालाही काही मर्यादा आहेत आज अनेक पालकांची व्यवसाय उद्योग धंदे बुडाल्यामुळे त्याना आर्थिक चणचणीला सामोर जावे लागत आहे.

फी न भरल्यामुळे कोणताही विद्यार्थी शाळेपासून व शिक्षणापासून दूर राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची व संस्थाचालकांची आहे असे सांगितले आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांना एक आश्रयस्थान असलेले अजय कौल यांनी आपल्या विभागात सामाजिक वसा जपत असताना शिक्षणाचे कार्य अव्याहत चालू ठेवले आहे मोहल्ला कमिटी द्वारे सर्वधर्मसमभाव एकात्मता या राष्ट्रीय ऐक्य या भावना समाजात रुजवल्या आहेत वर्सोवा विभाग म्हणजे सर्वसामान्य गरीब मच्छीमार व मध्यमवर्गी असलेल्या लोकवस्तीचा हा विभाग. कोव्हीड 19 प्रार्दुभावात अनेक गरजूंना वैद्यकीय, आर्थिक तसेच शैक्षणिक मदत केली आहे. अजय कौल सरांच्या कामगिरीबद्दल त्यांना कोरोना योद्धा हा किताब ही देण्यात आला आहे.

अजय कौल सर यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर यांचा सत्कार शाल श्रीफळ व भारतीय पत्रकार संघ (AIJ) सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक प्रशांत काशीद, इस्माईल खान, शोहेब म्यानुर उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here