Home आपलं शहर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या वादात मनसे ची सुद्धा उडी..

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या वादात मनसे ची सुद्धा उडी..

0
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या वादात मनसे ची सुद्धा उडी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शिवसेने चे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी मागील ५ दशकांहुन अधिक काळ शिवतीर्थावर सुरू केलेला दसरा मेळावा हे काळाचे समीकरण असताना आता याच शिवाजी पार्क वरील याच दसरा मेळावा यंदा उद्धव ठाकरे वा एकनाथ शिंदे गटापैकी कोणी साजरा करावा हा वाद पेटलेला असतानाच आणि या विषयावर कोंडी झालेली असतानाच आता त्यात मनसे नी सुद्धा उडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ‘गुढी पाडवा ‘ मेळावा शिवतीर्थावर घेणारी मनसे अचानक दसरा मेळाव्याच्या संघर्षात उतरल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडणार असे दिसत आहे.

मनसे चे राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचे खंदे वारसदार आहेत, त्यामुळे त्यांनीच शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशपांडे लिहितात की, ‘शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे, पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ‘वारसा हा वास्तूचा नसतो, परंतु विचारांचा असतो’, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे लगबग शिवसेनेला टोलाच लगावला आहे.

राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याने याचाही वेगळाच अर्थ काढला जात आहे. बृहन्मुंबई महापालिकेने अद्याप शिवसेनेच्या शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्याला परवानगी न दिल्याने शिवतीर्थावर दसरा मेळावा नक्की कोण घेणार याबाबत उत्सुकता व उत्कंठा असणार आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेना दसरा मेळावा घेण्यावर ठाम असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणारंच अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटात दसरा मेळावा घेण्यावरून दोन गट आहेत. त्यामुळे अध्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट नसून त्यात आता मनसे सुद्धा या वादात उतरल्याने ‘मैदान एक आणि नेते अनेक’ यामुळे आरोप प्रत्यारोपाचेच सीमोल्लंघन होतानाची चिन्ह ठळक रित्या दिसत आहेत.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here