Home आपलं शहर एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात..

एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात..

0
एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक हतबल झाला असून, नाकी नऊ झाला आहे. परंतु, अशातच महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची घडामोड घडली असून, एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना १०० रुपयांचा दिलासा मिळणार आहे. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिडंरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.

तसेच भारतील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले नाहीत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर जवळपास १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता १८४४ रुपये मोजावे लागणार आहेत.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here