Home आपलं शहर ‘ईडी’ ची मुंबईमध्ये मोठी कारवाई, ९१.५ किलो सोनं, तर ३४० किलो चांदी केली जप्त..

‘ईडी’ ची मुंबईमध्ये मोठी कारवाई, ९१.५ किलो सोनं, तर ३४० किलो चांदी केली जप्त..

0
‘ईडी’ ची मुंबईमध्ये मोठी कारवाई, ९१.५ किलो सोनं, तर ३४० किलो चांदी केली जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईमध्ये ‘इडी’ने मोठी कारवाई केली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या परिसरात ‘इडी’ला मोठं घबाड हाती सापडलं आहे, यामध्ये ९१.५ किलो सोनं तर ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ‘पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्याच्या तपासादरम्यान ‘इडी’ला मागच्या आठवड्यात हे घबाड हाती सापडलं आहे. ‘इडी’ला शोध कारवाई दरम्यान ‘मेसर्स रक्षा बुलियन’च्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचं ‘इडी’ला आढळून आलं. कोणतेही केवायसी न पाळता तसंच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं, कोणतंही रजिस्टर नसल्याचं :इडी’ला आढळून आलं आहे.

‘इडी’ने लॉकरची झडती घेतली असता त्यांना इकडे ७६२ लॉकर्स आढळून आले, यातले ३ लॉकर्स ‘मेसर्स रक्षा बुलियन’चे होते. लॉकर्स चालवताना २ लॉकरमध्ये ९१.५ किलो सोनं तर १५२ किलो चांदी सापडली आहे. याशिवाय ‘मेसर्स रक्षा बुलियन’च्या आवारातून अतिरिक्त १८८ किलो चांदीही सापडली आहे. हे सगळं सोनं-चांदी ‘इडी’ने तूर्तास जप्त केलं आहे.

जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४७.७६ कोटी एवढी आहे. ‘इडी’ने ‘मेसर्स रक्षा बुलियन’ आणि ‘मेसर्स क्लासिक मार्बल्स’च्या ४ परिसरांमध्ये शोध मोहिम पूर्ण केली. ‘मेशर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ च्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. त्याआधी ‘ईडी’ ने ८ मार्च २०१८ ला पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार ‘मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here