Home आपलं शहर बीकेसी मधल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना कोणी लिहून दिली ? अमोल मिटकरींनी लगावला टोला..

बीकेसी मधल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना कोणी लिहून दिली ? अमोल मिटकरींनी लगावला टोला..

0
बीकेसी मधल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना कोणी लिहून दिली ? अमोल मिटकरींनी लगावला टोला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत_

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून वादळी राजकारण रंगल्याचे दिसून आलं. अखेर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडला. दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची दसरा मेळावा पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात काल प्रथमच दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

या सभेतील भाषणात शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाषणाची स्क्रिप्ट भाजपची असल्याची खिल्ली उडवली आहे.

दसऱ्याच्या दिवशी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ट्विटरवर त्यांनी भाजपाचा केमिकल लोच्या झाल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात भाजपला स्थान मिळाले नाही, असा टोला लगावत याकडे अमोल मिटकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा “केमिकल लोच्या” झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.” असं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे.

“माननीय मुख्यमंत्री महोदयांचे बीकेसी मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट. या भाषणात नरेंद्रजी मोदी, आरएसएस व भारतीय जनता पार्टीवर स्तुतीसुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.” अशी टीकाही मिटकरींनी ट्विटच्या माध्यमातून केली.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here