
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्व मध्ये रिक्षेतून संशयास्पदरित्या प्रवास करणाऱ्या दोन जणांना राम नगर येथील डोंबिवली पोलीसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली असता एक चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे समोर आले.
अजदे गावात राहणाऱ्या तेजस नायर (वय: २२ वर्षे), मयूर केणे (वय: २३ वर्षे)अशी या दोन आरोपींची नावे आहेत. राम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाघ, निवळे, रावखंडे, सांगळे हे रामनगर पोलीस हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना डोंबिवली पूर्व येथील मानव कल्याण हॉस्पिटल च्या मागे टाटा लेन येथे तेजस आणि मयूर हे दोन आरोपी संशयितरित्या एका ऑटो क्र. एमएच ०५ डीएल १८१५ रिक्षेतून फिरत असल्याचे दिसून आले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे रिक्षेची कागदपत्र मागितली असता त्यांनी देण्यास नकार दिला. अधिक कसून तपास केला असता एमएच ०५ डीएल १८१५ या क्रमांकाची रिक्षा चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. पार्क केलेली रिक्षा चोरल्याचा गुन्हा या दोघांच्या नावावर असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
pagcor https://www.ngpagcor.net
bet777app https://www.bet777appv.org