
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा केली. आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या या पत्रकार परिषदेत आज मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूका जाहीर होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आयोगाने आज फक्त हिमाचलचीच निवडणूक जाहीर केली. हिमाचल प्रदेश आणि गुजरात यांच्या विधानसभेच्या कार्यकाळात ४० दिवसांचं अंतर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामानाची स्थिती महत्त्वाची आहे. विशेषत: या राज्याच्या उत्तर भागात जिथं बर्फवृष्टी होते, म्हणून हिमाचलची निवडणूक गुजरातच्या आधी जाहीर करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे.
विशेष बाब म्हणजे या निवडणूकी दरम्यान निवडणूक आयोग ८० वर्षांवरील व्यक्ती, दिव्यांग किंवा कोविड बाधित मतदार मतदान केंद्रावर येऊ शकत नसतील, तर त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान राज्यातील ठाकरे-शिंदे वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका यावर्षी खूपचं आव्हानात्मक ठरणार असून मतदार आणि राजकीय पक्ष सर्वांनाच या निवडणूका कधी जाहीर होतात याची उत्सुकता लागून राहीली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले होते.
playpal77 https://www.playpal77sy.org
9apisologin https://www.it9apisologin.com
taya333 https://www.taya333.org