Home आपलं शहर ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी राजस्थान कडून २.५० लाख मदत..

ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी राजस्थान कडून २.५० लाख मदत..

0
ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी राजस्थान कडून २.५० लाख मदत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यस्थान मधील २० हजारांहून अधिक संख्या असलेल्या ट्रान्सजेंडर्स समुदायासाठी गेहलोत सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रिया अर्थात ‘सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी’ (एसआरएस) करण्यासाठी २.५० लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या इच्छेनुसारच ही शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा ‘उत्थान कोष’ही तयार केला आहे राजस्थान हे देशातील पहिले राज्य असेल जिथे ट्रान्सजेंडरसाठी ‘सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी’ (एसआरएस) केले जाईल.

सामाजिक न्याय आणि हक्क विभागाचे उपसंचालक ओमप्रकाश तोष्णीवाल यांनी सांगितले की, सरकार एकतर शस्त्रक्रिया मोफत करेल किंवा २.५० लाख रुपयांपर्यंत पैसे देईल. इच्छुक पात्र ट्रान्सजेंडर सामाजिक सक्षमीकरण न्याय विभागात अर्ज करू शकतात.

२० नोव्हेंबर रोजी सरकार राज्यभर ‘ट्रान्सजेंडर डे’ साजरा करणार आहे. राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत ‘किन्नर महोत्सव ‘आणि ‘किन्नर कला व संस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी सरकार १० लाख रुपये आणि जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी १ लाख रुपये देणार आहे.

ट्रान्सजेंडरसाठी विविध योजना

* प्रत्येक ट्रान्सजेंडरचे ओळखपत्र बनवले जाईल, जेणेकरून सरकारी योजनांचा त्यांना लाभ घेता येईल.

* व्यावसायिक आणि तांत्रिक कोर्स मोफत दिले जातील.

* स्वयंरोजगारासाठी ५०,०००/- रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.

* कोटा, जयपूर, भरतपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर आणि अजमेर येथे समुपदेशकांची नियुक्ती.

* उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भत्ता, किराया आणि शिष्यवृत्ती.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here