Home आपलं शहर भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार..

भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार..

0
भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली असून त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला आहे. अत्यंत चुरशीने लढत होईल अशी अपेक्षा असलेल्या या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नंतर राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार आणि शेवटी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर विचार करून माघारीचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेतील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब करून पक्षाचे चिन्हं गोठवून पक्षाची नावे बदलून नवीन चिन्हे देणाऱ्या या निवडणुकीत अखेर भाजपाने उमेदवार दाखल केला आणि आता माघारही घेतली आहे.

मूळच्या शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती, पालिकेत नोकरीला असलेल्या त्यांच्या पत्नीला आधी राजीनाम्यासाठी झगडावे लागल्या नंतर आमदारकी मात्र आता सहज मिळणार आहे असे बोलले जात असून पोटनिवडणूक ही होणारंच असल्याचे चित्र दिसत आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here