
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा डोंबिवलीतील सावळाराम क्रीडासंकुलात दिनांक १२ ते १९ डिसेंम्बर रोजी सुरू होत असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ तर्फे १८ व्या अखिल भारतीय ‘आगरी महोत्सव २०२२’ च्या उद्घाटन समारोहाचा शुभारंभ राज्यमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकनेते आणि हभप वारकरी समुदायातील बुवा महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.


खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आगरी महोत्सवाचे उदघाटन व्हायचे होते, परंतु गुजरात येथील शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे माझ्यावर ही जबादारी आली आणि मला ही संधी मिळाली आणि या भव्य आगरी महोत्सवाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा आनंद होत आहे असेही नामदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणामुळे आगरी समाजाला न्याय मिळाला
नवी मुंबई येथील विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. विमानतळबाबत अनेक समस्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. ओबीसी आरक्षणाचे काम शिंदे फडणवीस सरकारने करुन आगरी समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे समाजातील अनेकांना चांगली संधी मिळेल असे वक्तव्य नामदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.

यावेळी व्यासपीठावर ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे, आमदार गणपत गायकवाड, माजी उत्पादनशुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, दशरथ पाटील, हभप. बाळकृष्ण महाराज, चेतन महाराज, जयेश महाराज, प्रल्हाद महाराज, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदार चव्हाण पुढे म्हणाले, आगरी महोत्सव उत्तरोत्तर वाढत चालला आहे. यामध्ये समाजातील विविध घटक एकत्र येतात. समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सत्कार या व्यासपीठावर होतो हे याचे वैशिष्ट्य आहे. ९० वे साहित्य संमेलन करण्यासाठी या ‘आगरी युथ फोरम’ने पुढाकार घेतला त्याचे कौतुक आजही होत आहे. ‘आगरी युथ फोरम’ सकरात्मक काम करीत असल्याने समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे.
यावेळी आमंदार गणपत गायकवाड म्हणाले कि, समाजात १८ वर्ष हा उत्सव एकत्रितपणे टिकणं मोठं काम होतं आणि ते झालेलं आहे. समाजाचं संस्कृतीत परिवर्तन करण्याचे काम वारकरी संप्रदायातील महाराजांनी केले. समाजाला एकत्र ठेवण्यात आगरी समाजाचा मोलाचा वाटा आहे.
यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, या आगरी महोत्सवात विविध सामाजातील बांधव सहभागी होत असतात. दि.बां पाटील यांच्या नावाने पाच जिल्ह्यांतून झालेली एकी पुढे कायम ठेवली पाहिजे. अखिल आगरी समाजाचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, दि.बांच्या नावाचा ठराव करून केंद्राकडे पाठवा असे आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावरुन पाटील यांनी ना.रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली. दरम्यान ‘कणसा’ या स्मरणिकेचे प्रकाशन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना गुलाब वझे यांनी केली तर सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
okebet168 https://www.okebet168u.org
fb777 slot https://www.fb7777-slot.com
fg777link https://www.befg777link.com
jilivip https://www.jilivipu.net