
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॅा.अनुपकुमार यादव उपस्थित होते.
मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समूहांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थींना व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तिकेत विविध योजनांची माहिती, लाभार्थींची पात्रता आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.