
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी आज आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन तूर्तास पुढे ढकलले आहे. सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने सोनारपाड्यातील शेतकऱ्यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी १३ जानेवारी रोजी उपासमारीमुळे सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

शेतकऱ्यांच्या आत्मदहन करण्याच्या इशाऱ्याची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा व आत्मदहनापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली. त्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.
तर शेतकऱ्यांची मागणी शासनाकडे पोहोचवण्यासाठी तहसीलदारांची भेट घेतली असून तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मिळून महसूल मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
यावेळी बैठकीला सोनारपाडा येथील शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, शिवनाथ म्हात्रे, हरिदास जोशी, ज्ञानदेव ठाकूर, सोपान ठाकूर, गणपत केणे, रवींद्र म्हात्रे, दिलीप ठाकूर यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
fg777link https://www.befg777link.com
playpal77 https://www.playpal77sy.org
slotphlogin https://www.exslotphlogin.net
philucky https://www.usphilucky.org
tayawin https://www.tayawinch.net